महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :
सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. १८ जून २०२३ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन कराड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षनाबरोबरच विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ वक्ते उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाची आमत्रंण पत्रिका महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांना देण्यात आली. तसेच मराठा आरक्षण व महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सकल मराठा जिल्हा अध्यक्ष अनिल घराळ बापू, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव ,राजेंद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारण बाजूला ठेवून विविध राजकीय पक्षांसह विविध संघटनेतील मराठा समाजाने या अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन ना. शंभूराज देसाई यांनी केले आहे.