रुग्णांना 24 तास सेवा देणार डॉक्टरांचे निवेदन
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पाटण : कोरोना काळात पाटण येथील काही डॉक्टर नॉन कोविड रुग्णांना त्यांच्या हॉस्पिटल मधून दाखल करून उपचार करण्यास स्पष्ट नकार देत आसल्याचे समोर येताच अशा डॉक्टरांच्यावर कारवाई होण्याची मागणी करत. तसेच कारवाई न झाल्यास प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी दिला असता संबंधित डॉक्टरांनी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांच्याकडे निवेदन देत रुग्णांना चौवीस तास सेवा देण्याची लेखी हमी दिली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. अशा प्रसंगी डॉक्टरांनी स्वतः ची योग्य काळजी घेऊन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. राष्ट्र संकटात असताना प्रत्येकाने कर्तव्य धर्म पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.. अशा संकट प्रसंगात कर्तव्य धर्म विसरणे योग्य नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्वहिंदू परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, आर.पी.आय. पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा. रवींद्र सोनावले, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ काळे, शेतकरी संघटनेचे पाटण तालुका अध्यक्ष शिवाजीराव कोळेकर, नायब तहसिलदार प्रशांत थोरात, पो.नि. चंद्रकांत माळी, शफीभाई सातारकर, राजेंद्र पाटणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य समीर सय्यद, संजय कुंभार यांची उपस्थिती होती.
पाटण येथील डॉक्टरांनी चौवीस तास रुग्णांना सेवा देण्याचे लेखी निवेदन पाटण चे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्याकडे दिले असून पाटण तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी कोरोना काळाच्या महामारीत रुग्णांना सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व डॉक्टरांना केल्या आहेत. अशा काळात डॉक्टरांनी सेवेत हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच असे सांगून डॉक्टरांच्या कडून रुग्णांच्या सेवेत टाळटाळ झाल्यास संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी त्वरीत प्रशासनाकडे तक्रार करावी. कोणीही स्वतः हून डॉक्टर अथवा त्यांच्या दवाखान्याती आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबर वाद घालून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.. असे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती वर देखील कारवाई करण्यात येईल असे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी यावेळी सांगितले.
शेवटी या प्रसंगी प्रशासनाने व सामाजिक ऐक्य समितीच्या सदस्यांनी योग्य तोडगा काढून आंदोलन यशस्वी केल्यामुळे पाटण शहरातील तमाम जनता तसेच सर्व पक्षाचे व सर्व संघटनांचे पदाधिकारी पाटणचे चे सर्व पत्रकार बंधु सर्वांच्या सहकार्याने व एकजुटीमुळे सदर आंदोलन आम्ही यशस्वी करू शकलो अशी भावना व्यक्त करुन नितीन पिसाळ यांनी सर्वांचे आभार मानले