प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी च्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न
अनेक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यामध्ये विविध विषयांवर व्यावसायिक चर्चा घडवणे व त्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी लक्षात आणून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. यावेळी रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांनी कंपनी सचिवांसोबतच्या त्यांच्या सहवासाची आठवण करून दिली
मुंबई : कंपनी सचिवांच्या सल्ल्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय कंपन्या काम करू शकणार नाहीत. कॉर्पोरेट क्षेत्र विशेषतः स्टार्टअप्सना त्यांच्या मदतीची गरज आहे. सुशासनाची खात्री करून आणि गुंतवणूकदारांची आशा आणि विश्वास कायम ठेवून ते भारतीय अर्थव्यवस्था पुढे नेणारे आहेत, असे प्रतिपादन खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजच्या २३ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नुकतेच खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांच्या हस्ते झाले. आशिष मोहन सेक्रेटरी आयसीएसआय तसेच इतर कौन्सिल सदस्य यावेळी उपस्थित होते. दोनदिवसीय कॉन्फरन्सची थीम कंपनी’ सेक्रेटरी या प्रिफर्ड प्रोफेशनल’ अशी होती. अनेक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यामध्ये विविध विषयांवर व्यावसायिक चर्चा घडवणे व त्यांना त्यांच्या कामाची जबाबदारी लक्षात आणून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. यावेळी रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांनी कंपनी सचिवांसोबतच्या त्यांच्या सहवासाची आठवण करून दिली. कंपनी सचिवांचे तीन कार्यक्षेत्र म्हणून रोजगार, सराव आणि शैक्षणिक यावर प्रकाश टाकत, सीएस देवेंद्र व्ही.देशपांडे, अध्यक्ष, आयसीएसआय यांनी आयसीएसआयने घेतलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. त्यांनी कंपनी सेक्रेटरीसाठी अँट्रव्युशन व मेडिएशनसारख्या क्षेत्रात असलेल्या संधीबद्दल देखील चर्चा केली आहे. यावेळी सुमारे १,४०० प्रतिनिधी, ३५० व्यक्तिशः आणि १,००० हून अधिक ऑनलाइन या परिषदेला उपस्थित होते.






















