सुनील निंबाळकर बारामती प्रतिनिधी…
*बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेचे नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या यांच्या व बारामती तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.*
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करण्याचे ठरल्यानंतर एकाही पठ्ठ्याने फॉर्म भरला नाही माळेगावचे तावरे नेहमीच एकी करून फिक्सिंग करतात त्यांचे राजकारण अद्याप आम्हा पवारांनाही कळाले नाही, अशी मिश्किल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शंकर पतसंस्थेच्या माळेगाव बुद्रुक येथील कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते अजित पवार म्हणाले की माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतही तावरे यांचे राजकारण समजून-उमजून चालत असल्याने दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे असोत की, दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे दोघांची नेहमीच एकी पाहायला मिळते ‘असे करू तसे करू’ आम्ही प्रचारात ओरडून सांगायचं मात्र, या फिक्सिंगमुळे (गळ्या शप्पथ) सांगतो तावरे यांचा राजकारणात कोणी हात धरायचा नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायती मध्ये होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले असे असताना ग्रामस्थांनी पूर्वीसारखे आगळ- पगळ वागू नये. काही चुकीच्या सवयी असतील तर त्या मोडाव्या लागतील. शासनाच्या डी. पी. तसेच टी.पी. प्लॅनिंग नुसार आपल्याला गावात बदल करावे लागतील.विकास आराखड्यानुसार काही बदल करावे लागतील, तसेच काही जागा आरक्षित करावे लागतील काही ठिकाणी झालेली अतिक्रमणे काढावे लागतील. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. दरम्यान माळेगाव कारखान्याच्या मागील गाळप हंगामात काही तांत्रिक चुकांमुळे फार मोठे नुकसान झाले कारखाना आपल्या ताब्यात आल्यानंतर ‘व्हीएसआय’ अधिकाऱ्यांनी सांगून सर्व दुरुस्त्या करून घेतल्या आहेत आता कारखाना जवळपास प्रति दिन आठ ते साडेआठ मेट्रिक टनांनी गाळप करत आहे असल्याचे त्यांनी सांगितले.