महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ नेले , वर्ये (ता. सातारा) येथे गावी येवून तीन दिवस राहिल्यानंतर पुन्हा पुणे येथे तो गेलेला २६ वर्षोय युवक कोरोना पोझिटिव्ह आढळला आहे . तीन दिवस तो गावात राहिला असल्यामुळे गावकरी धास्तवली आहेत . दरम्यान बाधित आढळल्याने ग्रामपंचायतीसह आरोग्य विभाग व महसूल प्रशासनाने उपाययोजना राबवल्या आहेत. फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेला युवक सुमारे दहा दिवसांपूर्वी पुण्याहून वर्ये या आपल्या गावी मित्रांसमवेत दुचाकीवरून आला होता. परंतु तीनच दिवसात तो पुन्हा पुण्यातील कात्रज येथे गेला . त्याला घशाचा त्रास होऊ लागल्याने त्याचा स्वॉब घेण्यात आला. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला . वर्ये येथील त्याच्या निकटवर्तीय कुटुंबातील ७ जणांना इन्स्टिट्यूट तर ८ जणांना होम कोरोनटाईन करण्यात आले आहे. रुग्ण बाधित आढळल्यानंतर वर्ये ग्रामपंचायत , महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी परिसरात भेट दिली व आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवल्या .