महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून कराड तालुका आणि ग्रामशाखा पदाधिकारी यांची निवड बैठक सातारा जिल्हाअध्यक्ष किशोर थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक अमर काबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह कराडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी विनोद लादे जिल्हासचिव सातारा यांची प्रमुख उपस्थिती होती. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संस्थेच्या कराड तालुका अध्यक्ष पदी कैलास आनंदराव कांबळे धम्म-प्रचारक यांची निवड करण्यात आली, तसेच कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष पदी मा. संतोष बजरंग वीर ओगलेवाडी यांची तर कराड तालुका सचिव पदी शंभूराज अशोक साठे सुपने यांची निवड करण्यात आली. तसेच कराड तालुक्यातील शामगाव ग्राम शाखेचे अध्यक्षपदी निखिल नितीन बागडे आणि उपाध्यक्षपदी गणेश शामराव वाघमारे यांची निवड करण्यात आली. सुपने ग्राम शाखेचे अध्यक्षपदी . हेमंत श्रीरंग कांबळे , राजमाची ग्राम शाखेचे अध्यक्षपदी . सचिन संतोष कांबळे , अंतवडी ग्राम शाखेचे अध्यक्ष पदी मा. पोपट पांडुरंग माने , आटके ग्राम शाखेचे अध्यक्ष पदी . शशिकांत लक्ष्मण दुपटे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष.किशोर थोरवडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. कराड तालुक्यामध्ये बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसार करण्याबाबत सूचना दिल्या तसेच नियुक्तीपत्र , आयडेंटी कार्ड देण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन मा. कैलास कांबळे यांनी केले तर आभार जिल्हासचिव मा. विनोद लादे यांनी मानले.