ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव : संतोष सुतार
खटाव तालुक्यातील हिंगणे येथील शेतकरी अजय यादव यांनी अवैध सावकारीला कंटाळून आज सकाळी त्यांच्या घरासमोर असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने खटाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे 10 ते 12 सावकारांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम वडूज पोलीस ठाण्यात सुरू आहे.
































