महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ फलटण : नांदल ता.फलटण येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय नांदल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदल, श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल येथे ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षी काढण्यात येणारी ढोल-ताशाच्या गजरात आणि विविध घोषणा देत काढण्यात येणारी प्रभातफेरी मात्र काढण्यात आली नाही. साध्या पद्धतीने मात्र उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक,ग्रामसेवक,कर्मचारी, ग्रामस्थ,काही विद्यार्थी उपस्थित होते.




















