काष्ट्राइब महासंघाच्या पुढाकाराने ऑलइंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, म रा जुनी पेन्शन संघटना, जि प. कर्मचारी संघटना व इतर संघटनाचे सहकार्याने जुनी पेन्शन -पदोन्नतीतील आरक्षण व इतर मागण्यासाठी महारॅली नागपूरवरून सुरुवात झाली आहे,अजूनही शासनाने दखल घेतली नाही तसेंच अनेक वेळा निवेदन, आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नाही म्हणून रॅली व धडक मोर्चा आयोजित आहें.
महाराष्ट्रातील 25जिल्ह्यातून ही रॅली भ्रमण करून 14मार्चला मंत्रालयावर धडकणार आहें. खालील मागण्या दि 14मार्च 2023पूर्वी काष्ट्राईब महासंघ सोबत चर्चा करून न सोडवल्यास, तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच दि 14मार्चपासून बेमुदत संपावर काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे व संलग्न संघटनाचे 5लाख कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत आहे.
मागणी –
1)2005नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे
2)7मे 2021शासन निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायलायच्या अंतिम आदेशास अनुसरून पदोन्नतीतील आरक्षण लागु करावे
3)बाह्य यंत्रनेद्वारा भरती बंद करून 10वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे
4)सरळसेवा भरती अंतर्गत 4लाख 80हजार रिक्त पदे तात्काळ भरणे
5)बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देने अन्यथा 15हजार बेरोजगार भत्ता मंजूर करणे
6)अधिकारी -कर्मचारी यांच्या सेवा निवृत्ती वयात भेदभाव न करता एक सेवाननिवृत्तीचे वय सम समान करावे
7)मागासवर्गीय विध्यार्थी यांची शिष्यवृत्ती वाढत्या महागाईच्या प्रमाणात मंजूर करावी व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, उच्च शिक्षणासाठी राज्यात व राज्यबाहेर शिक्षण घेणाऱ्या विध्यार्त्यांना फ्री शीप लागु करावी
8)आदिवासीची 12500अधिसंख्य पदाची पद भरती तात्काळ करावी
9)अंगणवाडी सेविका /आशा वर्कर्स यांना शासकीय दर्जा देने व 15हजार रु मानधन देण्यात यावे
10)बंध पत्रित परिचारिकांना तसेच अधीपरिचारिकांना सेवेत कायम करावे
11)प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सर्व कंत्राटी वाहन चालकांना सेवेत कायम करणे
12)अनुसूचित जाती करीता परदेशीं शिष्यवृत्तीची संख्या 75वरून 300 करण्यात यावी.
13)अनुसूचित जातीकरिता लोकसंख्याच्या प्रमाणात निधी ची तरतूद करणे या मागण्या 14तारखे पर्यंत मान्य न झालायल्यास काष्ट्राइब महासंघाचे 5लाख कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होतील असे अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांनो पत्रकाद्वारे कळविले आहें.






















