फलटण प्रतिनिधी
फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध महिलेचा तिच्याच नातूने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,वडीलोप्रर्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरुन चिडुन जाणवु मंगल बबन शिंदे (वय ६५ रा.ठाकुरकी मळा,ता.फलटण,जि.सातारा) या नेहमी प्रमाणे शेळ्या चारण्यासाठी फलटण शहरातील विमानतळ येथे गेल्या असताना त्या महिलेचा नातू आकाश सुखदेव शिंदे (रा.ठाकुरकी मळा ता.फलटण,जि.सातारा, हल्ली रा.आवी,ता.पंढरपूर,जि.सोलापुर)हा लाकडी काठीने मारहाण करत होता.त्यावेळी सदरची वृद्ध महिला ही जमिनीवर पडली असता आकाश याने एक मोठा दगड उचलून महिलेच्या डोक्यात मारून तीचा या महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे.याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात आनंदा बबन शिंदे (वय ४१ रा.विमानतळ नजीक,ठाकुर की मळा,फलटण,जि.सातारा) यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.




















