रेठरे खुर्द ता.कराड येथील मराठा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनेलने विजय संपादन केला.
विजयी उमेदवारांमध्ये आण्णासो ज्ञानू कळसे, तानाजी दादू मोहिते, राजाराम शामराव मोहिते, जयवंत काशिनाथ नलवडे, राहुल मधुकर पाटील, नेताजी शंकरराव पाटील, आनंदा रामचंद्र जाधव, कृष्णदेव गंगाराम साळुंखे, जयश्री बळवंत गोरे, नौशाक्का जयसिंग जाधव, बजरंग सिताराम कारंडे, जमाल गुलाब मुल्ला, अशोक भगवान गावडे यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवारांनी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांसमवेत राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी नामदार बाळासाहेब पाटील यांनी विजयी उमेदवारांसह सभासद, ग्रामस्थ, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बजरंग साळुंखे, विशाल मोहिते, सुनील मोहिते, विजय नलवडे, गणेश पाटील, दिलीप पाटील, धोंडीराम नांदळे जगन्नाथ गावडे, तानाजी मोहिते, प्रकाश मोहिते, विलास वंजारी, सुभाष कळसे, रवींद्र पाटील, वैभव कळसे, रमेश साळुंखे मोहन जाधव, सुभाष जाधव, जयकर पाटील, चंद्रकांत पाटील, सतीष पाटील स्वप्नील मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.
































