महाराष्ट्र न्यूज/ फलटण : बरड ता. फलटण येथील विवाहित महिला आपल्या मुलासह हरवल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. राणी चंद्रकांत अवघडे सध्या रा. बरड ता. फलटण जि. सातारा मूळ राहणार चोराडे, ता. खटाव जि. सातारा ही महिला 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 सुमारास बरड येथून हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. संजय बापू भिसे, वय 35, व्यवसाय मजुरी, यांनी ही फिर्याद नोंदवली असून त्यानुसार भिसे यांची मावस बहीण सौ.राणी चंद्रकांत अवघडे व मुलगा सोहम आजारी असल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी सासरी जाते असे सांगून 31 ऑगस्ट रोजी साडे अकरा वाजता घरातून निघून गेली आहे. परंतु ती तिच्या सासरी पोहोचलेली नाही. तसेच इतरत्र नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पो.हवालदार एम आर हांगे हे पुढील तपास करत आहेत.



















