सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे व माढा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा फलटण शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी जाळल्यानंतर ऐन दसऱ्यादिवशी
फलटण भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रामराजे यांचा पुतळा जाळण्यात आला .यावेळेस महाराष्ट्र न्यूजशी बोलताना अनुप शहा यांनी रामराजेंवरती घनाघाती टीका केली. पुढे बोलताना अनुप शहा म्हणाले की,नाव रामाचं धारण करून काम रावणाचे असणाऱ्या रामराजेंनी गेले 30 वर्ष तालुक्यात रामाच्या नावाने रावण राज्य करत आहे त्या रावणाचा आज आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर दहन करत आहोत.राम नावाच्या रूपामध्ये लपलेल्या रावणाचे दहन आम्ही ऐन दसऱ्याला करत आहोत.आमचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने पुतळा दहन केला होता.त्याचे जशास तसे उत्तर म्हणून आज आम्ही पुतळा दहन करून निषेध करत आहोत असा घणाघात अनुप शहा यांनी रामराजेंनवरती केला .आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन फलटण शहरातील महात्मा गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टीचे वतीने करण्यात आला .यावेळेस गजानन चौक स्थळी फलटण तालुका भाजपा अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोक जाधव , मा.नगरसेवक सचिन अहिवळे, यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.