सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे बेजबाबदार अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे रस्ते खराब होऊन लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. सदर प्रकरणी सा.बां विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिओ ओएफसी कंपनीला पैसे भरून न घेता शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडवून स्वतःचे खिसे गरम करून बेकायदेशीर खोदकामाला मुख संमती दिलेली आहे तसेच याबाबत तुषार मोतलिंग यांनी तक्रार केली असता अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केलेली दिसून आली,आम्ही वारंवार यांचे वरिष्ठ अधिकारी सा.बां. विभाग सातारा चे कार्यकारी अभियंता(पूर्व) शंकर दराडे यांना लेखी तक्रार केली परंतु कारवाई शुन्य कारण यांचे खिसे गरम झालेले आहेत त्यामुळे सामान्य जनता अपघात होऊन मेली तरी यांना फरक पडत नाही तसेच शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करून स्वतःची थैली भरलेली आहे,या बेकायदेशीर खोदकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे पण याचा भ्रष्ट अधिकाऱ्यांना काहीही फरक पडत नाही.
आज ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी बहुजन मुक्ती पार्टी ने हलगी बजाव आंदोलन केले आहे. शंकर दराडे यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांनी केलेल्या कामाची सुद्धा चौकशी करून निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी केलेली आहे तसेच या हलगी बजाव आंदोलनाला जाहीर पाठिंबा संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव यांनी जाहीर केला व शेतकऱ्यांचे नुकसान त्वरित भरून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे तसेच हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कैलास गायकवाड,विश्वास गायकवाड,विनोद माने,रफिक मुलाणी,आदिक इंगळे,राहुल वायदंडे, प्रकाश सावंत यांनी साथ दिली.