
मोर्चाच्यावतीने महाराष्ट्राचे महासचिव किरण कांबळे यांनी राज्याचे सामाजिक विकास मंत्री धनंजय मुंडे आणि महाराष्ट्र न्यूजला धन्यवाद दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, डीबीटी आणि स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी होती. या दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील हजार विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थी मोर्चाच्यावतीने याबाबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि कोल्हापूरचे समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांच्याकडे पाठपुरावा करून सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मागणीची आणि दैनिक महाराष्ट्र न्यूज मधील बातमीची दखल घेऊन या योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येणार आहेत.































