फलटणच्या भुयारी गटार योजनेचे पहिल्या पावसातच पोलखोल ….पाचबत्ती चौक फलटण येथील भुयारी गटार योजनेची दुरवस्था ………
फलटण शहरातील पचबत्ती चौक येथील भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत असून ही योजना पहिल्या पावसातच चेंबरमधून रोड वर उफाळून आलेले पाणी पाहता ह्या केलेल्या कामाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेमधून होत आहे .तसेच या मार्गावरून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा जाणारा असून दोन दिवस फलटण शहरी मुक्कामी आहे .संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला असून पालखी मार्गाचे कोणतेही काम झालेले दिसून येत नाही. हे काम कधी पूर्ण होणार याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नसून याची सर्वसामान्य जनतेकडून चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत . या भुयारी गटार योजनेच्या भोंगळ कारभारा वर जिल्हाधिकारी जातीने लक्ष घालणार का?
तसेच फलटण शहरात अनेक ठिकाणी अशीच भुयारी गटार योजनेची चेंबरची अवस्था झालेली आहे. तसेच भुयारी गटार योजनेचे केलेल्या निकृष्ट कामावर प्रशासकीय तपासणी अधिकाऱ्यांची भुयारी गटार योजनेच्या कॉन्ट्रॅक्टरवर मेहेरबानी राहणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे …