महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
सुपने सरपंच अशोक झिंब्रे राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित.
राजर्षी शाहू प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व मराठा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच मधून ही निवड करण्यात आली .
राज्याचे सहकार मंत्री श्री.अतुल सावे व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये राज्यातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या सरपंचांना पुरस्कार देण्यात आला.
श्री.अशोक झिंब्रे सरपंच यांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीचा हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे.






















