महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कृष्णा फाऊंडेशन वाठार ता. कराड येथील पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये “चिल्ड्रन्स डे” मोठ्या उत्साहात साजरा करतात आला. यावेळी शाळेच्या वतीने सर्व लहान मुलांमुलींना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी “चिल्ड्रन्स डे ” विषयी प्रिन्सिपल कविता नाडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले व गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
तसेच यावेळी मुलां मुलींनी विविध वेशभूषा परिधान करून क्रिडागुणांचे सादरीकरण केले. यावेळी सुनीता पाटील, अर्चना कदम, अनिल ठोंबरे, अमृता कुलकर्णी, शुभांगी साळुंखे,नर्गिस खान आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.यावेळी लहान मुलांच्या वतीने श्रेयस जाधव व मुलींच्या वतीने वेदिका जाधव यांनी आभार मानले.