कराड : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचा निषेध करण्यात येत आहे. कोश्यारी यांनी माफी मागावी अशीही मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
कराडमध्येही दत्त चौक येथे भगतसिंग कोश्यारी यांचा सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते नेत्यांनी एकत्र येत निषेध केला. यावेळी आंदोलकांनी कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळाही जाळण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती. झाकिर पठाण आनंदराव लादे. संतोष थोरवडे जावेद नायकवडी. दत्तात्रय दुप्पटे. शरद गाडे. भूषण पाटील .नवाज सुतार.शेतकरी संघटनेचे नेते अनिल घराळ. व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
































