महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास दिपक भिसे यांची कन्या अद्वैता दिपक भिसे हिचे हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला.याप्रसंगी छोटी अभिवादनसभा संपन्न झाली.यावेळी बहुजन शिक्षक परिवाराचे कुटुंबप्रमुख प्रविण लादेसर यांनी बाबासाहेबांच्या विचारांना डोक्यात घेण्याची गरज आहे.त्यासाठी घरोघरी संविधान पोहोचविण्याच्या अभियानाचा शुभारंभ केला.जिल्हा सचिव उदय भंडारे यांनी घरोघरी भीमसैनिक निर्माण होणे काळाची गरज आहे असे मत मांडले.कराड तालुका अध्यक्ष सदानंद साबळे यांनी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच गरजु मुलांना देणेचे आवाहन केले.कराड तालुका सचिव संगिता वाघमारे यांनी बहुजन कलाकार संघाची स्थापना झालेची घोषणा केली कलाकार शिक्षक चाॅंदसाब संदे,नलिनी बैले,उमेश सागरे यांची कोअरटीममध्ये निवड झाली.जिल्हा संघटक सुनंदा पाटणकर,महेश लोखंडे,प्रतिक्षा लोखंडे,मधुकर भंडारे,सुवर्णा भंडारे,महादेव झिमरे,सुरेश वाघमारे,संजय तडाखे,आबा खरात,अजित वाघमारे,सचिन चव्हाण,निवृत्ती धनवे,द्रौपदाबाई कसबे असे बहुजन शिक्षक परिवाराचे कराड व पाटण तालुक्यातील केडर उपस्थित होते.*