कराड : कराड येथील कराड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या केबिन मध्येच पूर्ववैमनस्यातून एकावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करण्यात आले. ही घटना आज दि. 1 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे पुढील दुर्घटना टळली. लखन भागवत माने (वय 40 रा.हजारमाची)असे चाकूहल्ला करणार्याचे नाव असून किशोर पांडूरंग शिखरे (वय 29 रा. हाजारमाची) हा जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.