सातारा दि. 30 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, मोठ्या प्रमाणात ॲक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांमध्ये ॲक्टीमेरा इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विचारात घेता प्र. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा रामचंद्र शिंदे यांनी पुढील आदेश जारी केले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल संलग्न मेडिकल व डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडे प्राप्त होणारा ॲक्टीमेरा (Actemra) इंजेक्शनची विक्री व वितरण जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांच्या लेखी परवानगीखेरीज करण्यात येऊ नये. जिल्हा शल्यचिकित्सक , सातारा यांनी सदरचे इंजेक्शन हे कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी रुग्णालयास इंजेक्शनचे शुल्क आकारणी व Clinical Guidelines च्या अनुषंगाने शासनाने निर्धारित करुन दिलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन वितरीत केले जाईल. तसेच कोविड हॉस्पिटल संलग्न मेडिकल वितरक, डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या ॲक्टीमेरा इंजेक्शनच्या साठ्याबाबतची माहिती सहा. आयुक्त, अन्न औषध प्रशसन, सातारा आणि जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांना दररोज उपलबध करुन द्यावी.
या आदेशात नमूद केलेल्या बाबींचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द साथरोग प्रतिबंधात्क कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा दुरुस्ती कायदा 2005 चे कलम 2 (a)(iii) नुसार संबंधितास दिलेला हॉस्पिटल व मेडिकल लायसेन्स, परवाना रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
Like this:
Like Loading...
Related