फलटण :
महाराष्ट्र शासनाचा सन २०१४-१५ यावर्षीचा महिला व बालविकास तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार फलटण तालुक्यातील श्रीमती वासंती संपतराव महामुलकर यांना जाहीर झाला आहे या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र श्रीमती वासंती महामुलकर यांना प्राप्त झाले असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा यांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.८ मार्च रोजी गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे सायंकाळी पुरस्कार वितरित होणार असून श्रीमती वासंती महु
महामुलकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे
यापूर्वी ही त्यांना कैलासवासी वासंती काळे पुरस्कार,शांती रत्न पुरस्कार,ज्ञानदा स्मृती गौरव पुरस्कार,छत्रपती शाहू महाराज पुरस्कार,जीवन गौरव पुरस्कार,समाज रत्न पुरस्कार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार,लायन्स क्लब पुरस्कार पुरस्कार मिळाले आहेत
श्रीमंत वासंती संपतराव महामुलकर या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या मातोश्री आहेत