म्हसवड नजीक धुळदेव बस स्थानका समोरच सातारा वरुन सोलापूरकडे ४४ प्रवासी घेऊन निघालेल्या बस मधुन अचानक इंजिन मध्ये धुराचे लोट व जाळ निघाल्याने बस ड्रायव्हर यांच्या प्रसंगावधातेमुळे कोणता हि विलंब न करता बस मधील ४४ प्रवाशी पाठीमागील बाजुस असलेल्या संकट काळी दरवाजातुन सर्व प्रवाशी खाली उतरून सुरक्षा स्थळी लांब उभे करुन बस वाहक व चालक यांनी म्हसवड पालिकेच्या अग्निशमन, म्हसवड पोलीस स्टेशन व दहिवडी डेपो यांना या घटनेची बाबत माहिती दिली म्हसवड नगरपालिकेची अग्निशमन गाडी येई पर्यंत बसचा पुढील ड्रायव्हर केबीन जळून खाक झाली होती धुराचे लोट व जाळ जोरात सुरु असताना भिती होती ती बसच्या डिझेल टाकीची कधी स्फोट होऊ शकतो मात्र अग्निशमन वेळेत आल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी चालक यांनी दाखवलेल्या तत्परतेने ४४ प्रवाशी सुरक्षीत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली याबाबत घटनास्थळावरुन चालक शंकर रामचंद्र पवार रा आष्टी ता कोरेगांव जिल्हा सातारा यांनी सांगीतलेली माहिती या प्रमाणे आज शनिवारी सकाळी १० वाजता चालक शंकर पवार व वाहक सुधीर जाधव यांनी ४५ प्रवाशी घेऊन सातारा वरुन सोलापूर कडे निघाले होते म्हसवड बस स्थानकात काही प्रवाशी उतरले बस मध्ये ४० प्रवाशी घेऊन दुपारी सव्वा ते दिड च्या दरम्यानम्हसवड पासुन ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळदेव बस स्टॅण्डवर एक प्रवाशी उतरण्यासाठी बस थांबली असताना बस मधुन धुर येवू लागलताच चालक पवार यांनी तात्काळ वाहक सुधीर जाधव यांना बसच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संकटकालीन दरवाजा उघडण्यास सांगत प्रवाशी यांना त्या दरवाजातुन प्रवाशी उतरवत असताना बसच्या पुढील डायव्हिंग केबीनने जोराचा पेट घेतला बसच्या सिटीने पेट घेतल्याने बसने आकराळविक्राळ रुप धारण केले होते तत्पूर्वी सर्व प्रवाशी सुखरुप स्थळी चालक व वाहक यांनी त्यांच्या साहित्यासह बाहेर काढून म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन, पोलीस स्टेशन व दहिवडी सातारा डेपोला या घटनेची बाबत माहिती दिली म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय बाजीराव ढेकळे ड्रायव्हर किरण जाधव व इतर कर्मचारी व म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी ड्रायव्हर प्रविण पिसे पाणी पुरवठा विभागाचे प्रकाश लोखंडे व नवनाथ वलेकर आदी पालिका कर्मचारी आगीच्या ठिकाणी पोहचले व आग काही वेळात विझवण्यासाठी आली असली तरी पेटलेल्या बसच्या डिझेल टाकावे पेट घेण्यात आधी अग्निशमन पोहचल्यानंतर डिझेल टॅक फुटला आसता तर मोठी दुर्घटना घडली असती अग्निशमन आग विझवण्यासाठी नंतर बसचा सांगाडा फक्त राहिला होता या घटनेची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात देण्यात आली आसुन आधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय बाजीराव ढेकळे करत आहेत