उंब्रज-प्रतिनिधी:
उंब्रज व उंब्रज पंचक्रोशीत अनुभवी व विश्वासू विमा प्रतिनिधी म्हणून विनायक जाधव यांची ख्याती आहे , Lic मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून जोडले गेल्यानंतर त्यांच्या कामाचा आणि यशाचा आलेख हा सतत चढताच राहिला आहे , विमा शतकवीर , विमा द्विशातकवीर , विमा कोट्याधीश होण्याचे बहुमान त्यांनी बऱ्याच वेळा प्राप्त केले आहेत .
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विनायक जाधव यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षात उंब्रज शाखेत शतकवीर होण्याची परंपरा कायम राखली आहे . त्यांनी चालू आर्थिक वर्षात 102 विमा पॉलिसी केल्या व 13 लाख प्रिमियम केला आहे. अथक परिश्रम व उत्तम संघटन कौशल्य यांच्या बळावर सलग 20 वर्षे शतकवीर व द्विशतकवीर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन , उंब्रज शाखेचे शाखाधिकारी गणेश दरेकर व सयाजी तिरमके यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच चीफ मॅनेजर प्रशांत हुमने , दिक्षीत सर , Y.T पवार सर , दत्ता सर यांनी त्यांचे अभिनंदन केले . या यशाबद्दल उंब्रज व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे .