फलटण : शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कोविशिल्ड या लसीचे साडेसोळा हजार (१६५००) डोस (मात्रा )आणि कोव्हकसीन लसीचे 880 डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
नागरिकांनी आपापल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि उपकेंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. स्मिता गावडे पवार यांनी केले आहे.