काष्ट्राईब महासंघ द्वारा शनिवारी,दि१० रोजी पेन्शन -पदोन्नती आरक्षण रॅली . महाराष्ट्र राज्य काष्ट्राइब महासंघाच्या पुढाकाराणे, आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन, म . .रा . जुनी पेन्शन संगठना, महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकारी संघटन द्वारा, जि प., कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटना द्वारा पेन्शन -पदोन्नतीतील आरक्षण रॅली दि 5/3/2023 संविधान चौक नागपूर येथून मा अरुण गाडे अध्यक्ष, काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या नेतृत्वात रवाना झाली असून ही रॅली वर्धा, यवतमाळ, अमरावती, दर्यापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, अहमद्पुर, लातूर, अंबेजोगाई, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जिल्हातून निघणार असून सातारा येथे दि 10 रोजी पोहचणार आहें,कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी कर्मचाऱ्यामध्ये आंदोलतात्मक वातावरण निर्मिती करून 14मार्चंला, मुंबई विधान भवनावर मोर्चाची धडक देणार आहें. ही पेन्शन रॅली सातारा (भिमाई भुमीत ), शनिवार दि 10रोजी सातारा शहरात येणार आहें. सातारा शासकीय निवासस्थान येथे राहण्याची व्यवस्था केली आहे . कार्यकर्त्याच्या भेटी व रॅलीची रुपरेषा ठरवली जाईल त्यानंतर रॅली ची सुरुवात दि 11/3/23, सकाळी १० वाजता डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून होईल व रॅली मोटरसायकल -कार द्वारा सातारा शहराच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मार्गावरून जाणार आहें आपण,आपली मोटर सायकल अथवा कारसह रॅलीत सहभागी व्हावे,प्रमुख मागणी1) एकच मिशन जुनी पेन्शन 2)पदोन्नती तील आरक्षण मिळालेच पाहिजे 3)10वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा 4)सुशिक्षित बेरोजगारांना 15हजार बेकारी भत्ता मिळालंच पाहिजे 5) सरलसेवेतील 4.80लाख रिक्त पदे भरणे या व इतर मागण्या, अभि नही तो कभी नहीं, ही विनंती, अजित वाघमारे यांनी केली आहे .






















