फलटण : श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मोळी पूजन दि. ५ नोव्हेंबर रोजी साखरवाडी येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी अजित जगताप यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी महंत श्री विद्वांस श्याम सुंदर शास्त्री, अध्यक्ष श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटण, व कंपनीचे संचालक चेतन धारू यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी महानंद डेअरी चे उपाध्यक्ष डी. के .पवार, पंचायत समिती माजी सभापती शंकराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, शेती अधिकारी सदानंद पाटील, विराज बाबर, सुरज बांदल, राज बरदुवा, हेमंत मुदलीयार, पिनल वाघमारे, के.के.भोसले, सागर कांबळे, राजेभाऊ भोसले, पोपट भोसले, पैलवान संतोष भोसले, पैलवान महेश भोसले, मच्छिंद्र भोसले, ट्रान्सपोर्ट विभागाचे नितीन भोसले व संतोष भोसले,व कारखान्याचे सर्व अधिकारी कामगार ऊसउत्पादक शेतकरी कंत्राटदार व कारखाना हितचिंतक उपस्थित होते.
































