मोही,येथील घटना
दहिवडी : ता.०४
माण तालुक्यातील मोही या गावी वावटळीने कन्या विद्यालयाचा पत्रा उडून गेला मंगळवारी दुपारी पाच वाजता मोही या ठिकाणी अचानक आलेल्या चक्रीवादळाने कहरच केला.
शेत सुखी झाल्यानंतर उन्हाळा जसजसा तीव्र होत जाईल तसा वावटळींचा तडाका शेतकऱ्यांना नेहमीच बसत आलेला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत असते काहींच्या घराचे पत्रे उडून जातात, तर काहींच्या वैरणीवर झाकलेले कागद लीलया उचलले जाऊन लांब वर जाऊन पडतात.
वाऱ्याच्या छोट्याशा जुळकीतून गरगर फिरत पालापाचोळा गोळा करत,प्लास्टिक कागद वगैरे स्वतःच्या चक्रात सामावत ही वावटळ उंच उंच जाते. वावटळ जेवढी उंच असते, तेवढा तीचा समुद्र सपाटीपासूनच्या अंतरावरून फिरण्याचा वेग देखील तीव्र असतो.अशा प्रकारे मोठी वावटळ तयार होते व ती एखाद्या चक्रीवादळासम भासू लागते. त्यामुळे अनेक जण या वावटळीला चक्रीवादळ देखील समजतात.
फक्त मोही परिसरात अचानक झालेल्या या मोठ्या आणि तीव्र गतीच्या वावटळीमुळे धर्मवीर शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाचा तीन खोल्यांचा पत्रा उडून गेला.
या चक्रीवादळाने कोणतीही जीवित हानी न करता लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले. अशी माहिती धर्मवीर शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाचे उपशिक्षक भारत चव्हाण यांनी दिली.