दत्ता घाडगे :-कामेरी
कामेरी ता.जि.सातारा येथील कुलदैवत जोतिर्लिग देवाची यात्रा यावर्षी उत्साहात संपन्न होणार आहे मंगळवार पासून यात्रेस प्रारंभ होत असून 4 एप्रिल रोजी रात्री देवाचा हरीजागर 5 एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सायं 5:30 वाजल्यापासून पुढे मारूख मळणे तसेच रात्री 9 वाजता देवाचा छबिना निघणार आहे
गुरूवार दि.6 रोजी श्री.हनुमान जयंती उत्सव व रात्री 9 वा.मनोरंजन कार्यक्रम तर शेवटच्या दिवशी 7 एप्रिल रोजी 11वा.मनोरंजनाचा कार्यक्रम तर 4:30 वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटी,ग्रामपंचायत कामेरी यांच्यावतीने देण्यात आली आहे




















