डाँ बाबासाहेबानी आपल्या विद्वततेच्या बळावर देशातील तमाम जनतेसाठी सर्वश्रेष्ठ संविधान निर्माण केले, विशेषतः ओबीसी बांधवासाठी त्यांच्या विकासासाठी उन्नतीसाठी प्रखर विरोध असताना संविधानात विशेष तरतूद केली. परंतु ओबीसी बांधव बाबासाहेबांचे उपकार समजून न घेता ब्राह्मणी धर्माच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर येताना दिसत नाहीं.
संविधानाची सातत्याने आवहेलना होतं आहे. पुन्हा या देशात ब्राह्मणी व्यवस्था आणली जात आहे. आणि या व्यवस्थेमध्ये ओबीसी सर्वात जास्त भरडला जाणार आहे.याचे भान ओबीसी नी घेणे काळाची गरज आहे.
जनतेच्या हिताचे कामगार कायदे रद्द करून भांडवलशाहीला पोषक कायदे निर्माण करण्यात आले.त्यामुळे कामगार देशोधडीला जाणार,म्हणून देशात बदल घडवून आणायचा असेल तर सर्व कामगारानी – कर्मचाऱ्यानी एकत्र येऊन लढा दिल्यास देशात बदल शक्य आहे असे प्रतिपादन मा अरुण गाडे, केंद्रीय अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांनी महाराष्ट्र राज्य काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ आणि बार्टी द्वारा आयोजित विभागीय मेळावा आणि सत्कार समारंभ प्रसंगी हिंदी मोरभवन येथेअर्पण सभागृहात व्यक्त केले.याप्रसंगी श्यामराव हाडके, जनार्दन मुन, नागरी हक्क संरक्षण मंच, सामाजिक कार्यकर्ता अब्दुल पाशा, गजानन थुल, सरचिटणीस,काष्ट्राइब डाँ हरिश्चन्द्र रामटेके,उपाध्यक्ष काष्ट्राईब,राजेश ढेंगरे,स्वागतध्यक्ष यशवंत माटे कृष्णा मसराम, ज्ञानेश्वर साळवे विचार मंचावर उपस्थित होते,या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच नागपूर विभागातील शासन सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह, शाल व पुष्प गुच्छ देऊन 30 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन का ष्ट्राइब जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष सीताराम राठोड, प्रस्ताविक स्नेहल मेंढे व आभार राजन मेश्राम यांनी केले.
अरुण खराते, संजय तायडे, अशोक पाटील विशाखा काळबांडे, प्रदीप नारायणे, रवीभाऊ पोथारे, प्रवीण घोडके,उषा वळमे सुचिता बिडकर, धिरेंद्र सोमकुवर, निरंजन वासे, भीमप्रकाश हरले,संजय अंभोरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
संकलन -सीताराम राठोड






















