शहरातून काढली सायकल रॅली; रॅलीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गुरुवार दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सायकल डे म्हणून पार पाडावयाचा असून यासाठी नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नगर पालिकेच्या आवारात येत असताना सायकल वरून प्रवेश करायचा आहे. तसेच सायकल शिवाय जर कोणी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केल्यास संबंधितासची त्या दिवसाची विनावेतन गैरहजेरी लावण्यात येईल असे, आदेशात नमूद केले होते. आज शुक्रवार आपल्यामुळे या आदेशाचे पालन करत कराड नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सायकल डे ची सुरुवात शहरातून सायकल रॅली काढून केली.
शहरातील दत्त चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, या रॅलीला प्रारंभ झाला तेथून रॅली दत्त चौक मार्गे चावडी चौक चावडी चौकातून कन्याशाळा मार्गे परत नगरपरिषदेच्या दिशेने येऊन नगरपालिकेत थांबली. या रॅलीत प्रामुख्याने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, भाजपाचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, नगरसेवक तसेच पालिकेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
इतर दिवशी पालिकेच्या आतील पार्किंग परिसरात दोन-चाकी चार-चाकी वाहनाने परिसर पूर्णपणे भरुन गेलेला पाहायला मिळतो. मात्र आज सायकल डे चा उपक्रम राबवल्याने आज पालिकेच्या परिसरात सर्वत्र सायकली पाहायला मिळाल्या.
प्रदुशण टाळण्याच्या दृष्टीकोनातून वसुंधरा नावाने एक अभियान चालू केले आहे. त्यामध्ये कराड शहराने सहभाग घेतलेला आहे. कराड शहरातील नागरिकांनी वसुंधरा अभियानाच्या निकषानुसार प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा व प्रदूषण टाळाव असं आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे