महाराष्ट्र न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले : इंदापूर तालुक्यातील कळंब येथील रविवारी , दि. १६ ऑगस्ट रोजी ८२ वर्ष वयाच्या वृध्दाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता . त्या वृध्दावर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत . त्या वृध्दाच्या संपर्कातील ८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . त्यामधील २ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे , अशी माहिती आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक संदीप एकतपुरे यांनी दिली आहे .त्यामुळे कळंबमधील कोरोनाची रूग्ण संख्या ३ वर पोहोचली असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने व वैद्यकीय सुत्रांनी नागरिकांना केले आहे .