नागठाणे :-प्रतिनिधी
अतीत ता.जि.सातारा गावच्या हद्दीत हॉटेल एम एच 11 जवळ राजे पान शॉप च्यामागे आडोशाला अविनाश विलास जाधव वय 27 वर्षे राहणार अतीत तालुका जिल्हा सातारा हा बेकायदा बिगर परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता देशी दारू विक्री करत असल्याचे दिसून आल्यावर बोरगाव पोलीस यांनी छापा मारत 21 सीलबंद बाटल्या असा एकूण 1470 रुपये किमतीचा प्रोव्ही माल विक्री करण्याचे हेतूने जवळ बाळगले स्थितीत मिळून आला त्यानुसार त्याच्यावर स.पो.नि.रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.सपकाळ व पो.काँ.पाटील यांनी कारवाई केली