हद्दीतील अवैध मटका व्यवसायवर कारवाई होणार -स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे.
नागठाणे/प्रतिनिधी
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मटका धंद्यासंदर्भातील वृत्त दै.महाराष्ट्र न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत बोरगावचे स.पो.नी रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे यामध्ये आज वर्णे ता.जि. सातारा गांवच्या हद्यीत जातकमळा नांवच्या शिवारात कॅनॉलजवळ चिंचेच्या झाडाखाली आडोशाला इसम नामे राजेद्र विष्णू बोभाटे , वय ४२ वर्षे , रा.अंगापूर , ता जि सातारा हा स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नांवचे जुगाराचे आकडयावर लोकांचेकडून पैसे स्विकारुन कल्याण मटका जुगार चालवित असताना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकुण १४६० / – रु.चे मालासह मिळून आला असून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरगाव पोलीसांनी महाराष्ट्र न्यूजच्या वृत्ताची दखल घेत बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मटका धंद्यावर
कारवाई सुरुवात केली हद्दीत सुरू असलेल्या अवैध मटका धंद्यावर कारवाई करणार असल्याची माहिती बोरगावचे स.पो.नी.रविंद्र तेलतुंबडे यांनी दै.महाराष्ट्र न्यूजला दिली.