नागठाणे भाग पत्रकार संघाच्या वृत्तांची सातारा परिवहने घेतली दखल
नागठाणे : काल नागठाणे येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या एस.टी रास्तारोकोच्या आंदोलनामुळे आज सकाळी 10:30वाजता नागठाणे कॉलेज मध्ये ज्युनियर कॉलेज,सिनियर कॉलेज प्राचार्य ,विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंखे उपाध्यक्ष-विक्रम बागल,नागठाणे गावचे उपसरपंच अनिल साळुंखे सदस्य दत्तात्रय साळुंखे,नागठाणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय घाडगे, साक्षी समूहाचे नितीन तात्या आणि सातारा आगराचे आगार व्यवस्थापक श्री शिंदे,सहा.वाहतूक अधि.श्री.महाडिक व वाहतूक निरीक्षक श्री. देशमुख यांच्यात बैठक पार पडली यात अध्यक्ष श्री.गणेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न परखडपणे मांडले विद्यार्थ्यांना येणाऱ्या बस अडचणी वर विशेष लक्ष देऊन लवकरच कॉलेज सुटण्याच्या वेळेत नागठाणे-तारळे बसच्या फेऱ्या वाढवून तसेच नागठाणे चौकात कायम स्वरूपात वाहतूक नियंत्रक नेमणूक करून विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील अशी सातारा आगारा तर्फे ग्वाही देण्यात आली.