पाटण प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचा चार मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त १ मे ते ५ मे या दरम्यान होत असलेल्या “पाटण महोत्सव २०२२” या उत्सवात मनोरंजना बरोबर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आयोजित केली असून या महोत्सवात कृषी प्रदर्शन, विविध रोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर, महाबचत शॉपिंग, बालगोपालां बरोबर वयोवृद्ध नागरिकां पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, विविध उपक्रम, वस्तू, साहित्य व खाऊगल्ली असे विविध प्रकारचे स्टॉल हे सर्व एकाच छत्राखाली आयोजित केले असून या महोत्सवाचा जास्तीत जास्त बालगोपालासह वयोवृद्ध नागरिकां पर्यंत सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन आयोजक, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
“पाटण महोत्सव २०२२” या उत्सवात धमाल उडवून देणारे विनोदी नाटक, महाराष्ट्राची लोकधारा सारख्या पारंपारिक कार्यक्रमासह लावणी महोत्सव, जादूचे प्रयोग, झोपाळे, पाळणे, आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमासह कृषी प्रदर्शन, विविध रोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर, महाबचत शॉपिंग, बालगोपालां बरोबर वयोवृद्ध नागरिकां पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, विविध उपक्रम, वस्तू, साहित्य व खाऊगल्ली असे विविध प्रकारचे स्टॉल हे सर्व एकाच छत्राखाली आयोजित केले असून विविध पदार्थ व्यंजनांची खाऊ गल्ली, तसेच यशस्वी उद्योजक मार्गदर्शकांकडून उत्तम व्यवसाय मार्गदर्शनाचा लाभ. नवउद्योजक- उद्योजिकांना पुरस्कार, नवोदित पोलिस भरती झालेल्या विद्यार्थी व प्रशिक्षक मार्गदर्शकांचा सत्कार, भव्य लकी-ड्राॅ सोडत, मस्त धमाल मस्ती आणि मजा हे सगळं “पाटण महोत्सव २०२२” मधे १मे ते ५ मे यादरम्यान बैल बाजार मैदान मार्केट यार्ड पाटण येथे अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त बालगोपालासह वयोवृद्ध नागरिकां पर्यंत सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन आयोजक, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.