सातारा – मौजे कळंभे तालुका वाई येथे शासनाचे नियम वेशीला टांगून अधिकाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक लाभापोटी बेकायदेशीर खाणपट्टा परवानगी दिली आहे.
संबधित विषयाची सखोल माहिती घेतली असता कळंभे गावातील गणपतीच्या माळावरील जो खाणपट्टा परवानगी दिलेली आहे ते सर्व नियमांना डावलून खाण चालवली जात आहे. खाणीच्या तीस फुटांवर लोक वापराची जागा असताना त्या जागी शेती केली जात आहे तसेच खाण लोकवापराच्या जागेपासून २०० मीटर च्या बाहेर पाहिजे, शंभर वर्ष जुने गणपतीचे मंदिर नव्वद मीटर वर आहे, लोकवस्ती शंभर मीटर वर आहे तसेच महू हातेघर ची पाईप लाईन तीस फुटांवर असताना खाणीचे खोदकाम केले जात आहे तसेच दिवसातून तीनदा ब्लास्टिंग केले जात व याच्यामुळे पाण्याच्या बोअर ची पाणीपातळी खालावली आहे तसेच खाणीमुळे तीनशे एकर जमीन कोरडी राहिलेले आहे त्यामुळे वास्तविकता पाहता या सर्व नियमांना बगल देत आर्थिक लाभापोटी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबधित खाणीवर कोणतीही नोंदवही उपलब्ध नव्हती तसे मंडल अधिकारी जाधव यांच्या निदर्शनास आलेली बाब म्हणजे परवानगी आहे अडीच हजार ब्रास ची व गौणखनिज काढले अंदाचे सहा हजार ब्रास व याची कागदोपत्री माहिती महसूल विभागाकडे सुद्धा उपलब्ध नाही म्हणजे से सर्व बोगस काम चालू असून अधिकाऱ्यांना पाकिटे पोहचली की बेकायदेशीर कामांना परवानगी देयची.
संबधित खाणी बाबत वारंवार तक्रारी केल्याने मंडल अधिकारी यांनी पाहणी साठी आले असता असे सांगण्यात आले की फक्त मोजमाप होणार आहे व कब्जा देताना ग्रामपंचायतीला कळवले जाणार आहे परंतु कोणतीही कल्पना न देता गावकऱ्यांना अंधारात ठेऊन खाण परस्पर चालंकरण्यात आली त्यामुळे कळंभे गावातील समस्त ग्रामस्थांची एकच मागणी आहे की बेकायदेशीर व लोकांना त्रास होत असल्याने खाण बंदच झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करू असे बोलताना सर्व ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य उपस्थित होते.