मराठा समाज बांधवांच्या पाठीशी असल्याचे केले जाहीर
दहिवडी : ता.०२
जालन्यात मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणास बसले होते.यादरम्यान पोलीस कर्मचारी व उपोषणकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली.यामध्ये वाद निर्माण होऊन पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर लाठीमार केला.यात उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत
या घटनेमुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत तसेच मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले.
यावर दहिवडी विश्रामगृहात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आ.गोरे म्हणाले की,मराठा समाजाच्या बांधवांनी आपल्या हक्कासाठी खूप मोठी लढाई केली आहे. जवळजवळ ६० मोर्चे लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने काढले होते.तरीही त्यांनी डाग लागू दिला नाही.दुर्दैवाने जालन्यात घडलेली घटना पोलिसांनी संयमाने हाताळायला पाहिजे होती दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निषेध केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली आहे. या घटनेत दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
त्या घटनेचा शासन स्तरावरून संबंधित लोकांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील भूमिका घेण्यास भाग पाडण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. सदर घटना निषेधार्ह आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते.मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून जी भूमिका मांडण्याची आवश्यकता होती ती भूमिका न मांडल्याने आरक्षण गेल्याचेही ते म्हणाले याबाबत योग्य ती चौकशी व्हावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असेही ते म्हणाले.