आत्मा परमात्मा, भूत, प्रेत या संकल्पना नाकारणारे तथागत बुद्ध आहेत.जगातले सर्व धर्म ईश्वरी संकल्पना जोपसणारे असून तथागत बुद्ध यांनी ईश्वर या संकल्पनेला स्पष्टपणे विरोध करणारे पहिले तत्वज्ञानी तथागत बुद्ध आहे. बौद्ध धर्मामध्ये माणूस हा केंद्रबिंदू असून माणसाने माणसाची कसे वागावे याची शिकवण व समता बंधुत्व व न्याय ही जीवन मूल्य जोपसणारे तत्वज्ञान देणारा एकमेव धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय.आज बौद्ध धर्माच्या भीतीमुळे धर्मांतरवर बंदी घातली जात आहे. बाबासाहेबानी आम्हाला बौद्ध धम्मात परत आणले, आमची प्रगती झाली,परत प्रतीक्रांती होऊ घातलेली आहे, संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे, धर्माधता वाढलेली आहे. याचा प्रतिरोध फक्त बुद्धिस्ट करू शकतात. परिस्थिती बदलायची असेल तर बौद्धांची एकजूट आवश्यक असल्याचे प्रतिपादन अरुण गाडे यांनी भदंत डाँ सावंगी मेधनकर यांच्या 23स्मृती दिनानिमित्त भदंत डाँ सावंगी मेधनकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे तथागत भगवान मूर्तिचे अनावरण आणि बौद्ध विहार लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध बौद्ध उपासक काशिनाथ मेश्राम, तर अतिथी म्हणून डाँ मुकुंद मेश्राम, श्यामराव हाडके, विमलताई आडे, डाँ चंद्रशेखर बांबोळे, प्रा प्रबुद्ध रंगारी, विजय बनसोड, प्रा आनंद काणेकर विचार मंचवर उपस्थित होते. वक्त्यांनी भदंत सावंगी मेधनकर यांचे जीवनावर व बौद्ध धम्माचे साहितेंवर भाष्य केले.
पहिल्या सत्रात सकाळी प्रेरणाभूमीच्या प्रांगणात धम्मध्वजाचे ध्वजारोहण व भगवान बुद्धाचे मूर्तीचे अनावरण व बुद्ध विहाराचे लोकार्पण भदंत रोहन बोधी महास्थवीर (श्रीलंका ) यांचे हस्ते करण्यात आले आणि बुद्ध विहाराचे लोकार्पण भदंत सत्यशील महास्थवीर, यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी भदंत सिवनी बोधानंद महास्थवीर, भदंत अश्वघोष महास्थवीर,, भदंत नागदीपनकर महास्थवीर, भदंत डाँ सिलवंस महास्थवीर, भदंत ज्ञानबोधी महास्तवीर डाँ भदंत मेत्तानंद, भदंत पय्यश्री महाथेरो, भदंत धम्मदीप महास्थ्वीर, भदंत प्रियदर्शी, भदंत बोधिरत्न, भदंत ज्ञानबोधी, भदंत रक्षितधर्म, भदंत ज्ञानदीप, भिक्कूनी नागकन्या, थेरी भिखुनी वयांचे उपस्थितीत संपन्न झाला.
दुसऱ्या सत्रात रोग निदान शिबीर घेण्यात आले, या कार्यक्रमात एम एस जांभुळे लिखित *संविधान जागर* लघु नाट्य तसेच संजय सायरे द्वारा मी *संविधान बोलतोय* एकपात्री नाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगत रामटेके, संचालन प्रेरणाभूमीचे सचिव प्रकाश बनसोड, व आभार सुमेध मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावाकडील व नागपूरवरून आलेले शेकडो लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता भीम गीत कार्यक्रमाणे करण्यात आली.