भारतातील शेतकऱ्यांना शेती विषयक संपूर्ण सेवा पुरवणाऱ्या देहात या तंत्रज्ञान आधारित कंपनीने हेलीक्रॉफ्टर या महाराष्ट्रस्थित बी२बी ॲग्री इनपुट ईकॉमर्स मार्केटप्लेस स्टार्टअपचे संपादन करून पश्चिम भारतात आपला पाया भक्कमपणे रोवला आहे .भारतातील सर्वात मोठी फुल-स्टॅक कंपनी असलेली देहात ही “देहात सेंटर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ६००० हुन अधिक सूक्ष्म उद्योजकांच्या माध्यमातून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांमधील सुमारे ८लाख शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहे.
बियाणे, खते, कीटकनाशक, कृषी अवजारे, पशुखाद्य व सर्व कृषी संलग्न उत्पादनांची विक्री करणारे स्थानिक कृषी केंद्रं आणि शेतमाल व्यावसायिक यांच्यासोबत भागीदारी करून देहात शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनं आणि सेवा प्रदान करते. देहातने हेलीक्रॉफ्टरसोबत काम करत असलेल्या २००० हून अधिक कृषी सेवा केंद्रे आणि ३० हून अधिक कंपन्यांसोबत नाते प्रस्थापित केले आहे.
देहातशी जोडल्या गेलेल्या ॲग्री इनपुट कंपन्यांद्वारे देहात सेंटर्सना सर्व प्रकारची कृषी उत्पादनं, देहात बिझनेस ॲप या अत्यंत सोप्या व सुलभ ॲपवरून दुकानात बसल्या बसल्या ऑर्डर करता येतात. कंपनीने मोक्याच्या ठिकाणी उभारलेली गोदामं, कार्यक्षम पुरवठा साखळी व ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी असलेली भागीदारी यांमुळे ऑर्डरची डिलिव्हरी जलद गतीने केली जाते.

या ॲपद्वारे देहात सेंटर्सचे दुकान ऑनलाईन दिसू लागते, आणि त्यांना त्यांच्या दुकानामधील उत्पादनं आणि सेवांबाबतची माहिती आसपासच्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येते. कंपनीची फिल्डवर काम करणारी मजबूत सेल्सटीम देहात सेंटरला त्यांच्या खरेदीचे नियोजन करण्यासाठी मदत करते, तर गावांमध्ये काम करणारी कृषी विस्तार टीम शेतकऱ्यांना त्यांच्या शेती विषयक समस्यांनुसार उपाय पुरवते आणि फार्मर मिटिंग, डेमोद्वारे शेतकऱ्यांमध्ये उत्पादनांबाबत जागरूकता निर्माण करते.
त्याचबरोबर ऑनलाईन जाहिराती, ॲप व फोनमार्फत पीक विषयक सल्ला व उत्पादनांची शिफारस, यांमुळे जास्तीत जास्त शेतकरी देहात सेंटर सोबत जोडले जातात. कंपनीने शेतमालाच्या ६०० हुन अधिक घाऊक खरेदीदारांसोबत भागीदारी केलेली आहे, ज्यात रिटेल साखळी कंपन्या, ईकॉमर्स, एफएमसीजी क्षेत्रातील महाकंपन्या, खाद्य प्रक्रिया उद्योग यांचा समावेश आहे. शेतमाल खरेदी करणारे देहात सेंटर कंपनीच्या माध्यमातून मालाची प्रत तपासणी, ग्रेडिंग, पॅकेजिंग करून पुढे त्याचा घाऊन खरेदीदारांना पुरवठा करू शकतात. शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीची प्रक्रिया सोपी करणे, आणि त्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळवून देणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, तर देहात सेंटर्ससाठी हे उत्पन्नाचे एक अतिरिक्त स्रोत आहे. अधिक माहितीसाठी कृषी व्यावसायिकांनी देहातच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा देण्यास इच्छुक असल्यास , १८००-१०३६-११० वर संपर्क साधावा






















