दहिवडी : ता.१३
दहिवडी(ता.माण) या ठिकाणी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. या यात्रेदरम्यान कुस्तीचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानामध्ये दहिगाव तालुका माळशिरस येथील पै. बाळू चिकणे याने सिद्धनाथ केसरीची चांदीची गदा पटकावली. अकलूज येथील पै. गणेश राणे याला आसमान दाखवत पै.बाळू चिकणे याने हा मानाचा ‘किताब पटकावला.
वस्ताद विश्वास दादा हरगुले यांचा हा पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेला पै. बाळू चिकणे हा गंगावेश तालीम कोल्हापूर आणि पै.अक्षय तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. दहिवडी यात्रेत सिद्धनाथ केसरीचा बहुमान पटकावल्याबद्दल पै.बाळू चिकणे याचे सर्व क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.