खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा संपन्न
लोणंद प्रतिनिधी बिलकीस पठाण शेख :
31मे रोजी हिमालय फौंडेशन संचलित “आम्ही लोणंदकर ” या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे जयंतीचे औचित्य साधुन मा . मिलिंद (दादा ) पाटील यांचे हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला . यावेळी इंडियन मेडीकल असो . चे डॉ . रोहन रावखंडे, डॉ . स्मिता पवार , लोणंद मेडीकल असो . चे अध्यक्ष डॉ . गणेश दाणी , डॉ . मिलींद काकडे डॉ . अविनाश शेळके , डॉ . निलेश सरक ,डॉ . किशोर शिंदे , डॉ . राहुल क्षिरसागर, रणजीत शेळके उपस्थीत होते . कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे मा . नगरसेवक हणमंतराव शेळके (पाटील ) मा . नगरसेवक ॲड सुभाष घाडगे, ॲड विलायत मणेर, श्री . अरूण गालींदे, शिवाजीराव शेळके (पाटील ) बबलुभाई इनामदार ,दिपक जाधव, राजुभाई इनामदार आदी मान्यवर उपस्थीत होते
यावेळी प्रस्तावना व हिमालय फाउंडेशनची माहीती सचिव जावेद पटेल यानी दिली . काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्री. साजीद बाळासाहेब बागवान, लोणंद काँग्रेस कमिटीचे सदस्य यानी सदिच्छा भेट दिली व उपक्रमा बद्धल शुभेच्छा दिल्या . ॲड . घाडगे यानी उपक्रमाबद्दल सर्व डॉक्टरांना सहकार्य करणेचे आवाहन केले . मुस्तफा लोणंदवाला , सुनिल यादव इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन पाहणी केली व उपक्रमास शुभेच्छा दिल्या . यावेळी हिमालय फाऊंडेशनचे सभासद सत्यजीत शानबाग ,आयुब सय्यद, जयंत कुलकर्णी , नवाब चौधरी , डॉ .दिपेन्द्र कोकरे , डॉ . प्रज्ञेश गोरड, ॲड सुरेश शेट्टी मोहम्मद मुल्ला उपस्थीत होते. आभार अध्यक्षा डॉ . माधुरी जाधव यांनी मानले.






















