ज्या सातारा जिल्हा परिषदेचे नाव राज्यभर विविध चांगल्या गोष्टींसाठी घेतले जात आहे त्याच जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागातील श्री.सुनिल विठठल रांजणे,सहाय्यक प्रशासन अधिकारी याने त्याच्या गोड गोड बोलण्याने तसेच मंत्रालयीन स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांशी जवळचे संबंध असल्याचे भासवून सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून कोटयावधी रुपयांना (दोन कोटी सत्यान्नव लाख रुपयांना) गंडा घातलेची बाब समोर आलेली आहे.रांजणे यांनी त्यांच्याविरुध्द जो तक्रार करेल त्याला भाडयाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमार्फत दमबाजी करण्यास सुरवात केलेली असल्यामुळे तक्रारदार भयभीत होवून हताश झालेले होते.स्वत:च्या संरक्षणासाठी रांजणे याने गुंड प्रवृत्तीचे खाजगी लोक भाडयाने घेतले असून जिल्हा परिषद आवारात तसेच तो ज्या भागात जाईल तीथे ते लोक त्याला संरक्षण देत आहेत. तक्रारदार यांनी रांजणेची तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडे संबंधितांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या प्रती आवश्यक कार्यवाहीसाठी पोलीस महासंचालक,पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयाकडे दाखल केलेली असून त्यातुन त्यांनी या ठगाचा व त्यांना साथ देणा-या सर्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषद मधील श्री सुनील विठ्ठल रांजणे याने गोड बोलून माझी ओळख वाढवून विश्वास संपादन केला व माझा भाऊ वरिष्ठ पदावर या पदावर सांगली जिल्हयात नोकरीला असून त्याची वरपर्यंत (पोहच) ओळख आहे. व तुमच्या मुलांना मी व माझा भाऊ तलाठी या पदी नोकरी लावू शकतो तरी तुमच्या मुलांच्या नोकरीचे काम करावयास असल्यास मी करून देतो असे सांगीतले तसेच रांजणे यांनी शासकीय अशी काही कागदपत्रे दाखवली, की ज्यावर शासनाची राजमुद्रा व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सह्या असणारी पत्रे, व जी शासनाची परीक्षा घेणारी TCS कंपनी यांची कागदपत्रे दाखवल्यामुळे व माझी मुले सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे मी भावनिक होऊन या गोष्टीस तयार झालो.
त्या कामासाठी माझा मुलगा व मुलीची तलाठी पदी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून माझ्याकडून ऍडव्हान्स पोटी रक्कम रुपये दहा लाख रुपये घेतले आणि दोन-चार दिवस झाल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाचा एक फॉर्म भरून घेतला. व त्यावेळी असे सांगितले की, तुमच्या संपर्कातील अनेक नावे द्या, त्यांच्याकडून मला प्रत्येकी एक लाख रुपये मिळाल्यास मी तुमच्या मुलांची कामे फुकट करून देतो, व तुमचे पैसे परत देतो, तसेच जे नाव देणारे मुले सुशिक्षित बेरोजगार मुले आहेत. त्यांनी मला एक लाख रुपये द्यावेत, आणि काम न झाल्यास त्यांना मी दोन लाख रुपये प्रमाणे परत देईन, सदर वेळेत सरकारी सही शिक्कयाची कागदपत्रे, व काही जणांच्या नोकरीच्या ऑर्डर दाखवल्या, त्यामुळे माझी खात्री होऊन मी त्यांना हो म्हणालो, ते मला भेटण्यासाठी नवले ब्रिज (पुणे) जवळ हॉटेल मसाका या ठिकाणी चार वेळा भेटण्यासाठी आले. त्यांनी मला त्यांच्या पर्सनल मोबाईल नंबर 8208849940 हा देऊन यावर बोलत जा, व मी सांगितलेले माहिती व त्यांनी दिलेला फॉर्म या विद्यार्थ्यांची पीडीएफ मध्ये माहिती मला करून पाठवा. त्यानुसार त्यांच्या गोड बोलण्याला व त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रावरून मला खात्री होऊन मी त्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर विद्यार्थ्यांची नावे व ईमेल ऍड्रेस पीडीएफ करून पाठवले, मी व माझ्या सहकारी यांनी सन 2023 मध्ये एकूण 297 विद्यार्थ्यांची नावे दिली व त्या विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक लाखाप्रमाणे एकूण 2 कोटी 97 लाख रुपये इतकी रक्कम त्यांनी ऑनलाईन न घेता रोख स्वरूपात घेतली व काम न झाल्यास तात्काळ त्याची दुप्पट रक्कम परत करेल, असा शब्द दिला, तर नंतर दिवसांमागून दिवस निघून जात होते, शासनाची तलाठी पदाची भरती झाली परीक्षा झाली, जर इतर नोकरीला लागले, ते कामावर हजर झाले, याची माहिती आम्हाला प्राप्त होताच, आम्ही श्री. रांजणे यांना याबाबत विचारणा केल्या असता शासनाकडून अजून रिक्त पदे भरणार आहेत व त्यामध्ये तुमची कामे होऊन जातील. माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगीतले.
याबाबत आम्ही शासन स्तरावर माहिती घेतल्या असता अशी कोणतीही पदे तलाठी यांची भरली जाणार नाहीत, अशी माहिती मिळाल्याने आम्ही श्री. रांजणे यांच्याकडे माझे सर्वांचे पैसे देण्याचा तगादा लावला. आम्ही तगादा लावल्यामुळे श्री. रांजणे आम्हाला भेटण्यासाठी पुणे येथे यायचे, येताना त्यांच्यासोबत गुंड प्रवृत्तीची लोक घेऊन यायचे व आम्हास नकळत दमदाटी ही करायचे व माझ्यासोबत आलेली लोक ही नामवंत गुंड आहेत, त्यामुळे मी देईल तसे पैसे घ्या किंवा मी देणार नाही, माझे काय वाकडे करायचे ते करा, तरी अद्यापही त्यांच्याकडून आमचे 297 जणांचे पैसे आम्हास माघारी दिले नाहीत. अशा प्रकारे माझी व माझ्या सहकाऱ्यांची श्री. रांजणे व त्यांच्या साथीदारांनी मिळून आम्हा सर्वांची व आमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन फसवणूक केली आहे. असे समजते की, आमची जशी फसवणूक केली आहे, त्याच प्रकारची फसवणूक सातारा जिल्ह्यातील अनेक मुलांची केलेची असल्याने त्यांच्यावर सातारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. असेही माहीत झाले आहे की श्री. सूर्यवंशी व श्री. जगताप हे शासनाचे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी (यातील काही निलंबित आहेत) यांची नावे वारंवार आम्हाला सांगायचे व त्यांनी मला पैसे परत केले की मी तुम्हाला परत करेल असा हा सातारा जिल्ह्यातील नोकरी लावणारा ठग श्री. रांजणे यांच्यावर योग्य ती कारवाई करून आमचे गोरगरिबांचे पैसे परत मिळावे तसेच आम्ही सर्व सहकाऱ्यांनी कर्ज काढून व सोने तारण ठेवून सदर नोकरीसाठी पैसे दिलेले आहेत त्यास योग्य ते शासन व्हावे, अशी विनंती. ठगाचा बंदोबस्त तात्काळ व्हावा अशी मागणी केलेली आहे.
श्री.सुनिल विठठल रांजणे यांना व त्याच्या साथीदारांना अशाच प्रकारच्या एका प्रकरणामध्ये सन 2009 मध्ये बंड गार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता तसेच सदर गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होऊन तेरा दिवसांनी जामीन मिळाला होता तसेच अटक कालावधीत त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ससून रुग्णालय (MLC विभाग) पुणे येथे उपचार घेतले होते. या सर्व बाबी जिल्हा परिषद मधील अधिकारी कर्मचारी यांना माहीत असूनही त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामार्फत येरवडा जेल, पोलीस स्टेशन, किंवा ससून हॉस्पिटल यांनासुध्दा पत्रव्यवहार करुन कागदपत्रांची मागणी केली नाही व सदरचे प्रकरण दाबून ठेवले रांजणे यांनी असे प्रताप करुनही सातारा जिल्हा परिषदेने त्यांच्या तक्रारीकडे सोईस्कर पणे डोळेझाक करुन रांजणे याला कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदांवर प्रमोशनचा लाभ दिलेला आहे.
रांजणे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये काम करीत असताना सुध्दा गैरव्यवहार केलेला असताना त्यांच्यावर कडक कारवाई ना करता त्यांच्या सोईसाठी माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद सातारा मध्ये त्यांची बदली केली होती.असाच प्रकार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश घुले यांनी केलेला आहे. सहा महिन्यापुर्वी रांजणे यांच्याविरुध्द एका पक्षाच्या पदाधिकारी यांनी तक्रारी अर्ज दाखल केलेला होता त्यावर त्यांनी ठोस कारवाई ना करता निव्वळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले व तक्रारदार यांची समजूत काढून तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मागे घ्यावा असा अप्रत्यक्ष सल्ला रांजणे यांना दिला व नेहमीप्रमाणे रांजणे यानी तक्रारदार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला.अशाप्रकारे प्रशासनाला हाताशी धरल्यामुळे आमच्या विरुध्द कितीही तक्रारी केल्या तरी काहीही कारवाई होणार नाही ही संकल्पना तक्रारदार यांच्या मनावर बिंबवण्यास रांजणे यशस्वी झाले आहेत.तक्रारी प्राप्त होवूनही श्री.निलेश घुले यांनी रांजणे यांची पाणी व स्वच्छता विभागातून नियमबाहयपणे माध्यमिक शिक्षण विभागात बदली करुन एक प्रकारे त्यांची सोय केली.याबाबत माहिती घेतली असता पाणी व स्वच्छता विभागात त्यांची पोस्ट नसल्यामुळे त्यांची माध्यमिक शिक्षण विभागात बदली केलेचे सांगीतले जात आहे.रांजणे यांना जेव्हा पाणी व स्वच्छता विभागात नेमणूक दिली तेव्हा त्यांना ही बाब माहिती नव्हती का. तीथे त्यांची पोस्ट नाही ही बाब 4 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयामध्ये नमुद केले असताना रांजणे यांना असे कारनामे करता यावे यासाठी सोईस्करपणे असा प्रकार केला गेला आहे. पाणी व स्वच्छता विभागातसुध्दा कंत्राटी कर्मचारी नेमताना रांजणे यांनी असाच काहीतरी घोटाळा केल्यामुळे त्यांची कार्यालयप्रमुख यांनी तक्रार केली म्हणून बदली करण्याची वेळ प्रशासनावर आली व प्रशासनाने त्यांची इतर कर्मचारी यांना डावलून मे 2025 च्या बदल्यांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागात बदली केली. रांजणे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे सोडून प्रशासनामार्फत त्यांची सोय का केली जात आहे असा प्रश्न तक्रारदार यांना पडलेला आहे. अशा कर्मचा-यावर वेळीच कारवाई केली नाहीतर समाजातील अजून सुशिक्षित बेरोजगार त्यांच्या अमिषाला बळी पडतील अशी भिती व्यक्त केली जात आहे.