सातारा:- तारळे ता. पाटण गावचे सुपुत्र व भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया संयोजक मा. श्री.रवींद्र लाहोटी यांची भारत संचार निगम लिमिटेड( बीएसएनएल ) सल्लागार समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मा. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी हार्दिक अभिनंदन केले. मा. नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे,मा. नामदार जयकुमार गोरे भाऊ, कराड उत्तर चे आमदार मा. मनोज दादा घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, सुनिल काटकर तात्या,प्रदेश सचिव भरत पाटील नाना,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ, संतोष जी कणसे, हर्षल गुरव, तारळे ग्रामस्थ तसेच जिल्ह्यातील, राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल तारळे विभागात जल्लोषाचे वातावरण आहे.
































