फलटण प्रतिनिधी – पाणी टंचाई तसेच धोमबलकवडी पाणी आवर्तनाविषयी नियोजनाबाबत शनिवार, दिनांक २२ मार्च रोजी आढावा बैठक आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असल्याची माहिती प्रियाका आंबेकर उपविभागीय अधिकारी फलटण यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील पाणी टंचाईच्या तसेच धोमबलकवडी पाणी आवर्तनाविषयी शनिवार, दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ठीक ११.३० वा. सभागृह, पंचायत समिती फलटण येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.