सातारा दि. 5 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षी (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकास अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून वरगढ (ओडिशा) करीता 13 व वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवरांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई व औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 17 जून 2020 पर्यंत मागविण्यात आले आहेत.
प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सर्व प्रादेशिकउपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांनी केले आहे.