पाटण प्रतिनिधी: ‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव सध्या चिंतेचा विषय आहे. गाव- खेड्यांमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव होत आहे. ‘कोरोना’वर औषध उपलब्ध नसल्याने आता लसीकरण नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच पर्याय दिसत आहे. याचा विचार करून वर्षाताई देशपांडे यांच्या लेक लाडकी अभियान च्या माध्यमातून त्रिपुडी या गावात औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले.प्रत्येक कुटुंबाला हे औषध देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याची अंमलबजावणीसुद्धा सुरु केली आहे.
लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून वर्षा देशपांडे या नेहमीच ग्रामीण भागातील लोकांना मदत करत असतात. तसेच त्रिपुडी गावातील ग्रामपंचायत ही ग्रामस्थांच्या साथीने कोरोना काळात चांगले कार्य करीत आहेत. त्रिपुडी ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ एकजुटीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्य करीत आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अशा गोळ्या आवश्यक असून त्याचा वापर केला पाहिजे. तसेच लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन ऍड. वर्षा देशपांडे यांनी दिल्याचे जनार्दन पवार यांनी सांगितले.या औषध वाटप कार्यक्रम डॉ. योगिता सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत सरपंच सौ.नंदा भरत पाटील,लेक लाडकी अभियानचे सदस्य जनार्दन पवार, तलाठी बाळासाहेब गायकवाड, भरत पाटील, संजय देसाई, शिवाजी देसाई,तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या उपस्थित मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.Attachments area