सातारा जिल्हामध्ये राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून सुनील माने यांनी केलेले कार्य उल्लेखनिय असून महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हामध्ये बूथ कमेट्या जास्ती जास्त स्थापन करण्याचे काम सुनील माने व राजकुमार पाटील त्यांनी केले असून त्याची दखल राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी घेतली असून त्याचा फायदा निश्चितपणे पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पार्टीला होणार आहे असे मत सरचिटणीस राजेंद्र लावंघरे यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले.
राष्ट्रवादी भवन सातारा येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनीलजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदेश मुख्यसंघटक राजेंद्र लावंघरे देशमुख यांनी दिल्या, यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी पार्टी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष शाफिक शेख उपस्थित होते.





















