कराड : सौ. दिपाली राजू गोडसे यांना दि.७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल ऑडिटेरीयममध्ये अमेरिकन राष्ट्रीय विद्यापीठ यांच्याकडून सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाणारी डि लीट (DLITT) ही पदवी राज्यसभेचे उपाध्यक्ष खासदार अनुभव मोहंती, शैक्षणिक मंत्री विनोद खन्ना, विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष अनितो थोरांडो, ब्लूक्रॉस सोसायटी भारतीय अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाला जगभरातून बावीस देशांचे प्रतिनिधी तसेच आठ देशांचे राजदूत विश्वशांती परिषदेचे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्रातून दिपाली राजू गोडसे यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. तसेच यावेळी इंटरनेशनल ह्यूमन राइट्स असोशियन यांनी दिपाली राजू गोडसे यांचे कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन इंटरनॅशनल कोविड डिफेंडर 2021 या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
गेली 15 वर्ष महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, महिलांवरील होणारे अत्याचार याच्या विरोधात आवाज उठवणे तसेच महिलांसाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात यशस्वी झाल्याबद्दल युरोपियन युनियनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दिपाली राजू गोडसे यांचे नाव नोंद करण्यात आले. या सर्व कार्य करण्यासाठी दीपाली गोडसे यांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या खंबीर पाठबळामुळे हे सर्व सन्मान प्राप्त झाले आहेत, तसेच गेली अनेक वर्ष कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायकबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 39 रुग्णांना पिवळ्या रेशन कार्ड वर मोफत उपचार तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलत या बाबी विनायक बाबा भोसले उर्फ विनुबाबा यांच्या मुळे यशस्वी झाल्या त्यासाठी दिपाली राजू गोडसे यांनी कृष्णा चाॅरिटेबल ट्रस्ट व हॉस्पिटल व सर्व कृष्णा परिवाराचे कृतज्ञता यावेळी व्यक्त केली.
यावेळी आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्ष सुमन ताई कोळी, अतीत गावचे युवा नेतृत्व संग्राम बनकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.






















